पुणे

पारगावच्या रस्त्यावरील अपघात थांबेना ; दुचाकीस्वार चिखलात पडून जखमी

अमृता चौगुले

नानगाव : पुढारी वृत्तसेवा :  पारगाव सा.मा. (ता. दौंंड) येथील रेणकाईच्या माथ्याजवळ सारखेच अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यामुळे येथे दुचाकी घसरून अनेक अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. सोमवारी (दि. 11) सकाळी पारगाव येथील नागरिक या रस्त्याने दुचाकीने जात होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी व चिखलाचा राडारोडा तसेच रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. अचानक चिखलात दुचाकी घसरली. गाडी आणि गाडीचालक रस्त्यावर कोसळला.

त्यांच्या पाठीमागे एक चारचाकी वाहन होते. त्या वाहनचालकाने तात्काळ ब्रेक लावले आणि पुढील मोठा अनर्थ टळला. दुचाकीस्वाराच्या डोक्याला मार लागला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याठिकाणी अनेकदा अपघात होत असून, नागरिक जखमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला वेग मिळत नाही. परिणामी, असे छोटे-मोठे अपघात होत असून, या ठिकाणी अपघाताचे सत्र थांबणार तरी कधी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT