पुणे

Accident News : शहरात पाच अपघातांत पाच जणांचा मृत्यू

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातांच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये वारजे माळवाडी, बालेवाडी, लुल्लानगर, अप्पर बिबवेवाडी, लोणी काळभोरमधील घटनांचा समावेश आहे.

खांबाला धडकल्याने दुचाकीस्वार ठार

भरधाव दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून तो विद्युत खांबाला धडकला. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 1 फेब्रुवारीला रात्री साडेबाराच्या सुमारास शिंदे पुलाजवळील एनडीए मैदानाजवळ घडला. जयेश नामदेव गावडे (वय 23, रा. शिवणे) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार जयेश हा 1 फेब्रुवारीला रात्री साडेबाराच्या सुमारास शिंदे पुलाजवळील एनडीए मैदानाजवळून जात होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो विद्युत खांबाला धडकला. त्यामुळे जयेश गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

व्यंकटेश कैलास ढोणे यांचा मावस भाऊ वैभव छगन जाधव (20, म्हातोबानगर, बालेवाडी) हा त्याच्या दुचाकीवर विलास भानुदास जाधव व मामाचा मुलगा विशाल विष्णू गायकवाड (23) यांना बसवून जात होता. त्यावेळी समोर आलेल्या टेम्पोला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. त्यात वैभव जाधव याचा मृत्यू झाला, तर विलास आणि विशाल गंभीर जखमी झाले. हा प्रकार बालेवाडी येथील साई चौकात 9 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता घडला.

टेम्पोच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पत्नी व दोन मुलींसह जात असलेल्या दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुरडीचा अपघाती मृत्यू झाला. हा प्रकार लुल्लानगर येथील पार्सी कॉलनीसमोर घडला. शहरबानो (03) असे अपघाती मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत मुलीचे काका सिराज फिरोज खान (39, रा. सत्यम कशिश सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. सिराज यांचा भाऊ सलमान व त्यांच्या दोन मुली शहरबानो आणि सहा महिन्यांची पलक तसेच त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात असताना टेम्पोचालक नरसिंह काबरे (रा. आंबेगाव) याच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत जखमी होऊन शहरबानो हिचा मृत्यू झाला असून, याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

20 वर्षांचा तरुण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कवडीपाट टोलनाका येथील महाराष्ट्र स्वीटसमोर 31 जानेवारी रोजी घडली. सोमनाथ विलास पारडे (20) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते पहाटे तीनच्या सुमारास घरी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT