पुणे

महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ ; अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

अमृता चौगुले

खारावडे : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील काशिग गावच्या महिला सरपंच वर्षा राहुल कदम यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नामदेव ऊर्फ आप्पा राघू टेमघरे यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वर्षा कदम हा काशिग गावच्या सरपंच असून, त्यांना आरोपी नामदेव ऊर्फ आप्पा राघू टेमघरे हे काही ना काही कारणास्तव त्रास देत होते. काशिग ग्रामपंचायतीकडून नुकतेच आयोजित केलेल्या ग्रामसभेत महिला सरपंच वर्षा कदम या मागील इतिवृत्तांत वाचत होत्या. या वेळी सरपंच कदम यांनी संशयित नामदेव ऊर्फ आप्पा राघू टेमघरे यांना दलित वस्तीत रस्त्याचे काम सुरू आहे, त्या कामात अडथळा का आणला, अशी विचारणा केली. त्या वेळी चिडून जात नामदेव टेमघरे यांनी सरपंच वर्षा कदम यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केला. त्यामुळे सरपंच वर्षा कदम यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार नामदेव राघू टेमघरे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. संशयित नामदेव टेमघरे यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही, ते फरार आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT