पुणे

Pune Rape Case : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेमाच्या जाळ्यात खेचून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. ही घटना सिंहगड कॅम्पस आंबेगाव बुद्रुक परिसरात फेब्रुवारी 2022 ते अद्यापपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी येथील 24 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव बन्सी शरमाळे (वय.24, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी तरुणीचा कॉलेजमधील मित्र आहे. त्याने तरुणीला प्रोजेक्ट तयार करायचा आहे, असे सांगून फ्लॅटवर बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने तरुणीला 'माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करूया,' असे म्हणून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो काढले. पुढे ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत परत त्याच्या व मित्राच्या फ्लॅटवर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच फिर्यादी तरुणीच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT