पुणे

leopard-hiding : कडुलिंबाच्या आडोशाला लपलेला बिबट्या कॅमे-यात कैद

backup backup

येथील अक्षय कानडे हे आपल्या कुटूंबाला पहाटेच्यावेळी काकड आरतीसाठी कुटुंबाला घेऊन जात होते. त्यावेळी अक्षय यांनी आपली चारचाकी गाडी सुरू करताच, गाडीच्या लाईटमध्ये कडुलिंबाच्या झाडामागे बिबट्या (leopard-hiding) दिसला. उजेड पडताच बिबट्याने झाडामागे लपण्याचा प्रयत्न केला. गाडीची लाईट बराच वेळ चालू ठेवल्याने बिबट्याने (leopard-hiding) पुन्हा डोकावून पाहिले. हा सर्व प्रकार अक्षय कानडे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

सविस्तर माहिती अशी की, अक्षय कानडे हे काकड आरतीसाठी आपली आई, चुलती आणि चुलते यांना सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. ही घटना आंबेगाव तालुक्यातील कळंब-कानडे वस्तीवर पहाटेच्या दरम्यान घडली.

कळंब, लौकी, चांडोली, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, साकोरे परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या आढळून येतो. हे बिबट्यांचे लपणक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सध्या या भागात ऊसतोड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने बिबट्यांचे लपणक्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे बिबटे नागरीवस्तीत घुसत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी, या परिसरात पिंजरे लावणे आवश्यक आहे. अशी मागणी सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी वसंतराव भालेराव, उषाताई कानडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांनी केली आहे.

हे ही पहा :

SCROLL FOR NEXT