पुणे- लक्झरी कारच्या धडकेत फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू.  (File Photo)
पुणे

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! लक्झरी कारच्या धडकेत फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, ३ जखमी

Pune Hit and Run : कारचालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील मुंढवा येथे मध्यरात्री हिट अँड रनची (Pune Hit and Run) घडना घडली आहे. मुंढवा परिसरात आज पहाटे १.३५ वाजण्याच्या सुमारास एका लक्झरी कारने दुचाकीला धडक दिली. यात फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कार चालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. पण, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या अपघाताच्या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पुणे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.

Pune Hit and Run : एकाचा मृत्यू, तिघे जखमी

पुणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार, "पहाटे १.३५ च्या सुमारास संशयिताच्या कारने पहिल्यांदा एका दुचाकीला धडक दिली, त्यात तीन जण जखमी झाले. नंतर कारने एका दुचाकीला धडक दिली; त्यात रौफ शेख याचा मृत्यू झाला. भरधाव कारने त्याला पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर ३४ वर्षीय आयुष तायल याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्या कारची ओळख पटली आणि नंतर त्याला हडपसर परिसरातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१, १२५ (ए), १३२, ११९, १७७, १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे."

संशयिताची वैद्यकीय तपासणी

तायल हा रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहे. मुंढवा येथील अपघाताच्या घटनेवळी तो मद्यधुंद अवस्थेत होता की नाही हे पाहण्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

याआधी मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या भरधाव पोर्शे कारने १९ मे रोजी पुण्यातील दोन आयटी इंजिनिअरना चिरडले होते. आता पुन्हा एक हिट रनची घटना घडली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT