पुणे

शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर सर्व्हिस रस्त्याकडे घुसला; एक ठार, तीन जखमी

Sanket Limkar

वडगाव : पुढारी वृत्तसेवा : मावळ येथील मातोश्री हॉस्पिटल, कुडे वाडा जवळ मुंबई पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने आलेला कंटेनर सर्व्हिस रस्त्याकडे घुसला आणि त्याठिकाणी उभी असलेली महीला कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली तर तीन विद्यार्थी जखमी झाली.

लता रणजित जाधव (वय ४१, रा. कुडे वाडा वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून संदीप झालटे (वय ४०, रा.दिग्विजय कॉलनी, वडगाव), सृष्टी भाटेकर (वय ११, रा.केशवनगर, वडगाव), मैत्रीय भवार (वय १४), मृणाल भवार (वय १४, दोघे रा.दिग्विजय कॉलनी) हे चार जण जखमी झाले आहेत.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडेवाडा बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे महिला, विद्यार्थी व नागरिक थांबले होते. सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी महामार्गाच्या कडेला एक शाळेची बस उभी होती, दरम्यान मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर (एम एच ४६ बी एफ ९१५७) हा पुढे उभ्या असलेल्या शाळेच्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रस्त्याकडे वळला व त्याठिकाणी असलेल्या चारचाकी कार, दोन दुचाकी यांना धडकून एका दुकानात घुसला.

दरम्यान या अपघातात सर्व्हिस रस्त्यावर उभी असलेली महीला कंटेनर च्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली, तर शाळकरी मुळे जखमी झाली आहेत. क्रेन च्या सहाय्याने कंटेनर उचलून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT