पुणे: चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (Latest Pune News)
आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र सावरसिध्द लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा उर्फ अर्चना पटेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदन नगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे.