पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या पोस्टरचे दहन केल्याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर गोपाळ बांगर, वनाजी बजरंग बांगर (रा. मंचर, ता. आंबेगाव), माऊली ढोमे, सतीश बोंबे, बन्सी पोखरकर, नरेश सोनवणे, शांताराम वरे, तुळशीराम बोंबे, मुरलीधर बोंबे (रा. पिंपरखेड) अशी त्यांची नावे आहेत.
भीमाशंकर साखर कारखान्याने उसाला 3300 ते 3400 रुपये प्रतिटन बाजारभाव जाहीर करावा, याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी उपोषण केले होते. कारखान्याने दिलेला अंतिम 3100 रुपये हप्ता आम्हाला मान्य नाही. याविरोधात आंदोलन करण्याचा तसेच वळसे यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा बांगर यांनी दिला होता.
प्रशासनाची परवानगी न घेता गर्दी जमवून सहकारमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी, त्यांच्या पोस्टरला चपलांने मारून ते पेटवून दिल्याबद्दल पोलिस शिपाई विशाल कचरू पालवे (रा. शिरूर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले तपास करीत आहेत.
हेही वाचा :