पुणे

पुणे : धर्माध शक्तींना ओमान आत्तार ची जबरदस्त चपराक

अमृता चौगुले

यवत : पुढारी वृत्तसेवा

देशभरात हिजाब प्रकरणावरून रान पटलेले असताना दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये, शिवजयंती निमित्ताने 10 वर्षीय ओमान जावेद आत्तार याने शिवजयंतीच्या मिरवणुकीत आरती वर ठेका धरत धर्माध लोकांना आपल्या नृत्या मधून खणखणीत चपराक दिली आहे.

केडगाव येथील चिमुकला मुस्लिम शिवभक्त ओमान जावेद आत्तार या चिमुकल्याने शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये शिवचरित्रावरील आरतीवर धरलेल्या ठेक्यामुळे संपूर्ण दौंड तालुक्यात आणि परिसरात त्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते.

दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये शिवजयंती मध्ये आयोजित कार्यक्रमात सर्वधर्मीय सहभाग कायमच पाहायला मिळत असतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करताना त्यांना सर्वच जाती धर्माच्या मावळ्यांनी मदत केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कोणत्याही जाती धर्माच्या चौकटीत मर्यादित ठेवू शकत नाही, असा संदेशच ओमान याने धर्माध शक्तींना दिला आहे.

ओमान आत्तार च्या कृतींबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल, व जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी कौतुक केले आहे. तर ओमान आत्तार नृत्य करत असताना त्याची क्षण चित्रे अचूकपणे केडगाव येथील डॉक्टर संदीप देशमुख यांनी टिपली आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT