पुणे

81 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त; 9 सहायक पोलिस फौजदारांना सेवानिवृत्तीच्या दिवशी पदोन्नती

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र पोलिस दलात प्रदीर्घ सेवा केल्यानंतर 81 पोलिस अधिकारी व कर्मचारी पुणे पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले, तर 19 निवृत्त होत असलेल्या सहायक पोलिस फौजदारांना पोलिस पोलिस उपनिरीक्षकपदावर पदोन्नती (फौजदार) देण्यात आली. मंगळवारी सकाळी पोलिस मुत सेरोमोनीयल परेडचे आयोजन करण्यात आले होते.

परेड कमांडर म्हणून सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मानवंदना दिली. याप्रसंगी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलिस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण, इतर अधिकारी अमंलदार व निवृत्त होणारे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

पोलिस आयुक्त गुप्ता यांच्या उपस्थितीत येथील आरएसपी शेड येथे सेवानिवृत्त अधिकारी व अमंलदार यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना देखील निमंत्रीत करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याबद्दल सर्व कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. निवृत्त होत असलेल्या सर्वाना पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT