पुणे

पुणे : जि.प.भरतीसाठी 74 हजार अर्ज

अमृता चौगुले

पुणे : जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी एक हजार पदांसाठी 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुणे जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील 21 पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला यातून 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. आयबीपीएस या खासगी यंत्रणेद्वारे ही सर्व प्रक्रिया होत आहे. अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली होती.

सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक (पुरुष) पदासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. या पदासाठी 124 जागा असून, त्यासाठी 28 हजार 209 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सर्वाधिक जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) पदासाठी 436 जागा असून, त्यासाठी 3 हजार 930 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी 37 जागांसाठी 4 हजार 575 उमेदवारांनी, आरोग्यसेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या 128 जागांसाठी 2 हजार 898 अर्ज आले आहेत. औषध निर्माण अधिकारी पदासाठी 25 जागांसाठी 5 हजार 573, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी 1 हजार 405 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

जिल्हा परिषदेच्या या विविध पदांसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेला अर्ज प्रक्रियेतून प्राप्त झालेले पैसे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कंपनीला देण्यात येणार आहेत. दरम्यान, विस्तार अधिकारी (पंचायत) 3 जागांसाठी 1 हजार 784, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 जागासाठी 819, विस्तार अधिकारी (कृषी) 2 जागांसाठी 193, विस्तार अधिकारी (शिक्षण) 2 जागांसाठी 144, वरिष्ठ सहायकाच्या 8 जागांसाठी 5 हजार 31, पशुधन पर्यवेक्षकच्या 30 जागांसाठी 463, कनिष्ठ आरेखकच्या 2 जागांसाठी 68, कनिष्ठ लेखा अधिकारी 3 जागांसाठी 213 अर्ज आले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT