पुणे

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात पीएमपीच्या आज 672 जादा गाड्या

अमृता चौगुले

पुणे : पीएमपी प्रशासनाकडून अनंत चतुर्दशीनिमित्त आज (दि. 28) 672 जादा गाड्या मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत. या जादा गाड्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात धावतील, असे पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले. दरवर्षी अनंत चतुर्दशीला म्हणजेच पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी शहरातील उपनगरांसह राज्यभरातून नागरिक येत असतात. या वेळी शहरात येणार्‍या नागरिकांसाठी पीएमपी प्रशासनाकडून नियोजित गाड्यांव्यतिरिक्त 672 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासोबतच मध्यवस्तीतील प्रमुख मार्गांवर निघणार्‍या विसर्जन मिरवणुकांमुळे येथील पीएमपीची सेवादेखील बंद राहणार आहे.

बस स्थानक, मार्गांमध्ये बदल…

स्वारगेट येथील शाहू महाराज बस स्थानक, नटराज बसस्थानक, स्वारगेट स्थानकाबाहेरील मूळ बसस्थानकांत बदल करण्यात आले असून, ही स्थानके तात्पुरत्या स्वरूपात लक्ष्मी नारायण चौक, पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ), वेगा सेंटर या ठिकाणी असतील. येथून सातारा रोडने कात्रज, मार्केट यार्ड, सिंहगड रोड, सोलापूर रोड, पुलगेट, हडपसर तसेच भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठेकडे जाता येणार आहे. कोथरूड, वारजेकडून येणार्‍या बससेवा नळस्टॉपपर्यंत असतील, तर काही मार्गांवरील बस येथून वळविण्यात आल्या आहेत. तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन या बाजूची बससेवाही वळविण्यात आली आहे.

24 तास धावणार

प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तत्काळ सेवा मिळावी यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नियमित संचलनासह रात्रीही सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला 24 तास बससेवा उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT