पुणे : दिवाळीनिमित्त मिळालेल्या सुट्यांमध्ये शहरात येणार्या आणि बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत, एसटी प्रशासनाने पुण्यातील आगारांमधून 512 अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे एसटीच्या पुणे विभागाने ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख आगारांमधून या अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याकरिता एसटी प्रवाशांना तिकीट खिडकीसह ऑनलाइन तिकीट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यानुसार या गाड्यांचे आरक्षण होण्यास सुरुवात झाली असून, काही गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. बाहेरगावाहून पुण्यात कामधंद्यासाठी आलेल्या चाकरमान्यांची, व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना बाहेरगावी जाताना कोणतीही अडचण आणि त्रास सहन करावा लागू नये, याकरिता पुण्यातून खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ये-जा करणार्या प्रवाशांकरिता या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पिंपरी-चिंचवड येथील एसटीची आगारे प्रवाशांच्या आणि गाड्यांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होतात. त्यामुळे दरवर्षी एसटी प्रशासन खडकी, कॅन्टोन्मेंट भागातील मोठी मैदाने भाड्याने घेऊन येथून अधिकच्या काही गाड्यांचे नियोजन करते. यंदाही असेच नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे.
बस स्थानक ज्यादा गाड्यांची संख्या
शिवाजीनगर 44
स्वारगेट 157
पिंपरी-चिंचवड 244
कॅन्टोन्मेंट बोर्ट खडकी 244
एकूण गाड्या 512
हेही वाचा