पुणे

मिळकत कराचे 2273 कोटी जमा; पालिकेच्या तिजोरीत ऑनलाइन सर्वाधिक भरणा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या तिजोरीत सन 2023-24 या आर्थिक वर्षात मिळकत कराच्या माध्यमातून 2 हजार 273 कोटी 27 लाख 10 हजार 131 रुपये इतके उत्पन्न जमा झाले असून, यामध्ये सर्वाधिक 1 हजार 179 कोटी 6 लाख 96 हजार 14 रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा झाले आहेत. महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटींचे सादर करण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मिळकत करातून 2318.15 कोटी उत्पन्न गृहीत धरण्यात आले. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 11 लाख 93 हजार 294 मिळकतदारांकडून 2 हजार 273 कोटी 27 लाख 10 हजार 131 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मिळकत कर जमा झाला आहे.

एकूण मिळकतदारांंपैकी 6 लाख 60 हजार 547 मिळकतदारांनी ऑनलाइन पेमेंट करणे पसंत केले आहे. ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून महापालिकेकडे 1 हजार 179 कोटी 6 लाख, 96 हजार रुपये इतका मिळकत कर जमा झाला आहे. 1 लाख 36 हजार 351 जणांनी धनादेशाद्वारे 808 कोटी 51 लाख, 65 हजार रुपये इतका कर जमा केला. तर 3 लाख 96 हजार 396 मिळकतदारांनी रोख स्वरुपात 285 कोटी 68 लाख 48 हजार 974 कोटी रुपये इतका मिळकत कर जमा केला. मागील आर्थिक वर्षात (2022-23) या आर्थिक वर्षात महापालिकेला मिळकत करापोटी 1 हजार 868 कोटी 44 लाख 13 हजार 783 रुपये जमा झाले होते. या तुलनेत चालू आर्थिक वर्षात (2023-24) 404 कोटी रुपयांहून अधिक मिळकत कर जमा झाला आहे. (2024-25) महापालिकेने मिळकतकरातून महापालिकेच्या तिजोरीत 2 हजार 400 कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मे अखेरपर्यंत 5 ते 10 टक्के सवलत

महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून 31 मे अखेर मिळकत कर भरणार्‍यांना मिळकत करामध्ये 5 ते 10 टक्के इतकी सवलत मिळणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी मिळकत कर लवकर भरावा, असे आवाहन टॅक्स विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी नागरी सुविधा केंद्रावर मिळकत कराची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, ऑनलाइन पेमेंटसाठी विविध पर्याय दिले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT