जून अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात नव्या 200 बस दाखल होणार; निविदा प्रक्रिया पुर्ण File Photo
पुणे

Pune PMP Bus: जून अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात नव्या 200 बस दाखल होणार; निविदा प्रक्रिया पुर्ण

तर जुन्या 236 बस स्क्रॅप होणार

प्रसाद जगताप

पुणे: पीएमपी प्रवाशांना अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. जून 2025 अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात 200 नवीन स्वमालकीच्या सीएनजी बसगाड्या दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कार्यालयीन अध्यादेशही काढण्यात आले आहेत.

महत्वाचे मुद्दे:-

  • पीएमपीच्या ताफ्यात नव्याने 200 स्वमालकीच्या सीएनजी बसगाड्या दाखल होणार.

  • या बसगाड्या टाटा मोटर्स कंपनीच्या सीएनजी असणार आहेत.

  • नवीन बसगाड्या दाखल करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

  • या संदर्भात कार्यालयीन अध्यादेश जारी करण्यात आले आहेत.

  • सध्याच्या ताफ्यातील 236 जुन्या बसगाड्या स्क्रॅप केल्या जाणार आहेत.

  • नवीन सीएनजी बसगाड्यांमुळे पीएमपीच्या ताफ्यातील पर्यावरणपूरक गाड्यांची संख्या वाढणार आहे. (latest pune news)

प्रवाशांना होणारा फायदा:-

  • नवीन आणि आरामदायी असलेल्या या बसगाड्यांमुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखद होईल.

  • सीएनजी बसगाड्यांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, यामुळे पुणे शहराची हवा अधिक स्वच्छ राहील.

  • नवीन गाड्यांमुळे बसची उपलब्धता वाढेल आणि प्रवाशांना वेळेवर बस मिळण्यास मदत होईल.

  • स्वमालकीच्या गाड्या असल्यामुळे पीएमपीला गाड्यांच्या देखभालीवर अधिक नियंत्रण ठेवता येईल, यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळेल.

पीएमपीच्या ताफ्यात 200 नवीन सीएनजी बसगाड्या दाखल होणे, हे पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नवीन गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळेल. जुन्या गाड्या स्क्रॅप केल्याने ताफ्यातील आधुनिक गाड्यांची संख्या वाढेल आणि देखभाल खर्चही कमी होईल. आमचा प्रयत्न आहे की, पुणेकरांना जास्तीत जास्त चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवावी. जून 2025 अखेरपर्यंत या 200 नव्या बस ताफ्यात दाखल व्हायला सुरूवात होतील.
- राजेश कुदळे, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT