

Weather Forcast of Monsoon
हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व सरी
पुणेः नैऋत्य मोसमी पाऊस 13 मे रोजी मंगळवारी अंदामान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्या भागात जोरदार पाऊस सुुरु झाला असून पुढील 24 तासांत तेथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागरासह,अरबी समुद्रातही येईल असही अंदाज देण्यात आला आहे.
गत चोवीस तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या ठिकाणी अवघ्या काही तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता असून त्या बेटांवर पावसाळी गतिविधी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी दिला.
हवामान विभागाने जाहिर केलेल्या अंदाजात म्हटले आहे की,मंगळवारी 13 मे पर्यंत मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर त्या बेटांच्या काही भागात प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.तसेच पुढील चार ते पाच दिवसांत दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागासह मालदीव,कोमोरिन आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात तो दाखल होईल.
सोमवारी 12 मे रोजी राज्यातील बहुतांश भागात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.तसेच 13 आणि 14 मे रोजी राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.राज्यात वाार्यांचा वेग वाढला असून ताशी 50 ते 60 कि.मी वेगाने वारा वाहत आहे.