पुणे

पुणे: भिगवणजवळ कार पलटी होऊन २ तरुण ठार, ३ जण जखमी

अविनाश सुतार

भिगवण, रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ स्वामी चिंचोलीजवळ भरधाव कारने ४ पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात २ युवक ठार तर ३ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. १२) दुपारी एकच्या सुमारास घडली. वैभव विठ्ठल जांभळे (वय २४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) व प्रतीक पप्पू गवळी (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) अशी मृतांची नावे आहेत. तर असिफ बशीर खान (वय २२), सुरज राजू शेळके (वय २३, दोघे रा. भिगवण, ता. इंदापूर) आणि ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय २२, रा. इंदापूर) हे तिघे जखमी झाले आहेत.

यातील वैभव हा टेलर व्यावसायिक होता, तर प्रतीक हा दत्तकला शिक्षण संस्थेत फार्मसीला असल्याचे कळते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ५ तरूण भिगवणकडून पुण्याकडे कारमधून (एमएच ४२ एएक्स ४७२९) निघाले होते. त्यांची गाडी स्वामी चिंचोली (ता. दौंड) हद्दीत हॉटेल पंचरत्नजवळ आल्यानंतर गाडी अतिवेगात असल्याने गाडीने चार ते पाच पलट्या खाल्ल्या. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. पुढील तपास रावणगाव पोलीस करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT