मार्केट यार्डात चक्क अडीच किलोचा आंबा (Pudhari Photo)
पुणे

Pune Mango News | अबब..! मार्केट यार्डात चक्क अडीच किलोचा आंबा; आकाराची चर्चा दिवसभर

कर्नाटकातून दिडशे किलो आंबे बाजारात दाखल झाले आहेत

पुढारी वृत्तसेवा

Pune Gultekdi Market Yard 2.5 kg Mango

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मंगळवारी (दि.१३) चक्क दोन ते अडीच किलो वजनाच्या दीडशे किलो आंब्याची आवक झाली. कर्नाटकातून दाखल झालेल्या या आंब्याच्या किलोला 60 ते 70 रुपये भाव मिळाला. फळबाजारातील डी. बी. उरसळ अ‍ॅण्ड सन्स फर्मवर ही आवक झाली. कर्नाटक परिसरातून बाजारात दाखल झालेल्या या आंब्याच्या आकाराची चर्चा मार्केट यार्डात चांगलीच गाजली.

कर्नाटकात या आंब्याला खुदादाद या नावाने ओळखले जाते. या आंब्याची कोय लहान तसेच साल राहते. तसेच गर अधिक प्रमाणात असतो. याची गोडी साधारण असते. मंगळवारी बाजारात वीस ते तीस किलोच्या पाच क्रेटमधून ही आवक झाली. यामध्ये आंब्याचे सरासरी वजन हे दोन ते अडीच किलो राहिले. त्याची लष्कर परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केल्याची माहिती अडतदार रोहन उरसळ यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT