Child Abuse Case  Pudhari
पुणे

Pune 20 Year Prison Sentence: भोर तालुक्यात मुलीवर लैंगिक अत्याचार – आरोपीला २० वर्षे शिक्षा!

पुणे जिल्हा न्यायालयाने बजरंग खोपडे याला कठोर शिक्षा; पोक्सो आणि IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल. वाचा पूर्ण तपशील!

पुढारी वृत्तसेवा

सारोळा: भोर तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी बजरंग रामचंद्र खोपडे (वय ३२, रा. तेलवडी, ता. भोर, जि. पुणे) यास पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. हे आदेश न्यायाधीश एस.एम. टाकळीकर यांनी दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिला धमकावत अत्याचार केला. २९ मार्च २०१९ रोजी मुलीची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय तपासात ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर प्रकार नोव्हेंबर २०१८ साली घडले होते. फिर्यादी यांनी राजगड पोलीस ठाण्यात नसरापुर कामथडी (ता.भोर) येथे तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी बजरंग खोपडे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (३), ५०६ तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करून राजगड पोलिसांनी आरोपीला ३० मार्च २०१९ अटक करण्यात आली होती.

खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद व तात्कालिन राजगड सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. राठोड, पोलीस नाईक अमिर शेख तपासी कामकाजामुळे व खटल्यात तब्बल ११ साक्षीदार तपासून न्यायालयाने आरोपी बजरंग रामचंद्र खोपडे याला वीस वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड शिक्षा, भारतीय दंड संहिता कर ५०६ खाली एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT