अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आता सोमवारी; सुधारित वेळापत्रक जाहीर  File Photo
पुणे

11th Admission Merit List: अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आता सोमवारी; सुधारित वेळापत्रक जाहीर

येत्या 30 जून रोजी पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केले असून, वेळापत्रकानुसार येत्या 30 जून रोजी पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

विद्यार्थी आणि कॉलेज लॉगिनमध्येसुद्धा ते दाखविले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना याबाबतचे एसएमएस पाठविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Pune News)

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला असून, विद्यार्थी व पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण विभागातर्फे इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश जाहीर करण्यात आले. आता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. तसेच महाविद्यालयांनी कोटानिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करायची आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, 1 ते 7 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे.

त्याचप्रमाणे विनंती अर्ज करून झालेला प्रवेश रद्द करता येणार आहे. त्यानंतर नऊ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT