Class 11 admission round 3
पुणे: राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्या फेरीत 1 लाख 11 हजार 235 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. आता प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 25 आणि 26 जुलै रोजी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार असून, राज्यातील महाविद्यालयांनी 11 ऑगस्टपूर्वी वर्ग सुरू करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आतापर्यंत अकरावीच्या दोन फेर्यांमध्ये 7 लाख 20 हजार 666 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. (Latest Pune News)
तिसर्या फेरीमध्ये 13 हजार 621 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी, 4 लाख 10 हजार 498 विद्यार्थ्यांनी कॅपसाठी, तर 82 हजार 952 विद्यार्थ्यांनी राखीव कोट्यातून अर्ज भरला होता. त्यापैकी 1 लाख 11 हजार 235 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.