SSC Result 2025 Pudhari
पुणे

SSC Result 2025: प्रतीक्षा संपली, उद्या दहावीचा निकाल! 'या' संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

Maharashtra Board SSC Exam 2025 Result Date Announced: दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Board SSC Exam 2025 Result Date Announced Marathi News

पुणे: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्या मंगळवारी (दि.13 मे) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) घेण्यात आली होती.

5 मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल लागला होता. तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल.

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

या संकेतस्थळावर मिळेल अतिरिक्त माहिती-

  • www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

  • www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.

गुणांची पडताळणीही करता येणार...

निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांत विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल.

हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://ssc_student.mahahsscboard.in/ यावर करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी 14 मे ते 28 मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. तर पुरवणी परीक्षेसाठी 15 मे पासून अर्ज भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT