Sinhagad Fort: सिंहगड किल्ल्याला शिवकालीन वैभव प्राप्त होणार; 285 कोटींचा विकास आराखडा मंजूर

प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठवणार
Sinhagad Fort
सिंहगड किल्ल्याला शिवकालीन वैभव प्राप्त होणार; 285 कोटींचा विकास आराखडा मंजूरPudhari
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे

खडकवासला: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनिय शौर्याचा आणि हिंदवी स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचा जिवंत वारसा असलेल्या सिंहगड किल्ल्याला पुन्हा शिवकालीन वैभव प्राप्त होणार आहे. स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने गडाच्या विकासासाठी 285 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा मंजूर केला आहे.

गडाच्या उन्मळून आलेला कल्याण दरवाजा, पुणे दरवाजासह ढासळणारी तटबंदी, बुरुज, पाऊल वाटा, पायर्‍या तसेच ऐतिहासिक वास्तूंची शिवकालीन बांधकाम शैलीत उभारणी करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

Sinhagad Fort
Pune RTO: पुणे आरटीओचा बेशिस्तांना लगाम; महामार्गांवर 34 हजार वाहनचालकांना दणका

या शिवाय पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पायी मार्गावर रेलिंग, शिवकालीन अमृतेश्वर व इतर मंदिरांचा जीर्णोद्धार, संग्रहालय, दिशादर्शक फलक, पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, प्रकाश योजना व 52 जलस्रोतांचे संवर्धन व पुनरुज्जीवन आदी कामे विकास आराखड्यात करण्यात येणार आहेत. सिंहगडच्या इतिहासात प्रथमच गडाच्या विकासासाठी मोठ्या निधीचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

आ. तापकीर हे गेल्या सात-आठ वर्षांपासून शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत होते, मात्र आराखडा मंजूर करण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याने अनेक वर्षांपासून विकास आराखडा लालफितीत अडकला होता. त्यामुळे आ. तापकीर यांनी याकडे विधिमंडळात शासनाचे लक्ष वेधले होते,

तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही रखडलेल्या सिंहगड विकास आराखड्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत सरकारने विकास आराखड्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहगड विकास आराखड्याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विकास आराखड्याला तत्त्वतः मान्यता देत हिरवा कंदील दाखवला आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

Sinhagad Fort
Accident News: स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; लोणी काळभोरमधील दुर्घटना

सिंहगड किल्ल्याला शिवकालीन वैभव प्राप्त व्हावे, गडावरील ऐतिहासिक वास्तू, स्थळांचे जतन व्हावे तसेच देशासह जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रीय लढ्याचा जिवंत इतिहास अनुभवता येण्यासाठी विकास

आराखडा मंजूर होणे आवश्यक होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील निस्सीम भक्तीपोटी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी बहुमोलाचे योगदान दिले आहे.

- भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला विधानसभा मतदारसंघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news