पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातून गणेशोत्सवानिमित्त कोकण विभागासह इतर ठिकाणी असलेल्या आपापल्या गावी जाणार्या भाविकांची लगबग सुरू झाली आहे. यासाठी एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडल्या आहेत. महिला तसेच जेष्ठ आणि इतरांना देण्यात आलेल्या विविध सुविधेचा फायदा घेत, वल्लभनगर आगारातून कोकणात जाण्यासाठी शनिवार (दि. 16) रोजी तब्बल 100 हून अधिक बुकिंग झालेल्या बस धावणार आहेत.
गेल्या गणेशोत्सवकाळात किमान 50 ते 55 जादा बस कोकण मार्गासाठी बुकिंग झाल्या होत्या. मात्र या वेळी दहा दिवसांपूर्वीच गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट बसची बुकिंग झाली आहे. या बस चिपळूण, दापोली, देवरुख, गुहागर, खेड, रत्नागिरी, कासे, परचुरी, सावंतवाडी, राजापूर, फौजी आंबवडे या मार्गावर धावणार आहेत.
65 वर्षांवरील ज्येष्ठांना निम्मे तिकीट, तर 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येतो. तसेच 40 ते 45 जणांसाठी ग्रुप बुकिंगची सोय केली आहे. महिलांसाठी हाफ तिकिटाची योजना सुरू केल्याने महिलांनीदेखील मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेतला आहे.
हेही वाचा