Parth Pawar Land Deal Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका 40 एकर जमीन गैरव्यवहारामुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कोरेगाव पार्कमधील महार वतनाची तब्बल ₹1800 कोटींची जमीन फक्त ₹300 कोटींना विकल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर झाला आहे. या व्यवहारात त्यांच्या Amadea Holdings LLP कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात मुद्रांक शुल्कातील सवलत, आयटी धोरणाचा गैरवापर, आणि मालकी हस्तांतरणातील अनियमितता, असे गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आहेत. विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, हे नेमकं प्रकरण काय आहे, ते आपण समजून घेऊ या.
पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील 40 एकर जमीनचा हा वाद आहे.
1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे.
एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क 21 कोटी रुपये भरलं जाणं अपेक्षित होतं,
पण प्रत्यक्षात फक्त ₹500 शुल्क भरल्याचं समोर आलं आहे.
ही जमीन पूर्वी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेच्या ताब्यात होती.
या जमिनीवर अनेक वर्षे कोणताही सरकारी प्रकल्प न झाल्याने ती मूळ मालकांना परत दिली गेली.
पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने या जमिनीच्या 273 मूळ मालकांकडून “पॉवर ऑफ अटर्नी” घेतली.
या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये जमीन विक्री व हस्तांतरणाचे अधिकार देण्यात आले.
पण नियमांनुसार 2,000 नंतरची नोटराइज पॉवर ऑफ अटर्नी वैध नाही, तरीही 2006 मध्ये ती करण्यात आली.
यामध्ये मालकांना किती मोबदला देण्यात आला, याचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही.
19 वर्षांनंतर या जमिनीचा नवीन खरेदीदार ठरला- Amadea Holdings LLP.
या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे: सर्व्हे नं. 132, बी-21, यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर, पुणे - 411005.
कंपनीचे काम आहे: वाहन दुरुस्ती, मोटरसायकल विक्री, घरगुती वस्तू विक्री अशी आहे.
एवढं असूनही या कंपनीनं 300 कोटींचा जमीन व्यवहार केला, पण कंपनीचं भागभांडवल फक्त ₹1 लाख आहे.
कंपनीचे दोन भागीदार —
(1) पार्थ अजित पवार (अजित पवारांचे सुपुत्र)
(2) दिग्विजय अमरसिंह पाटील (पार्थ पवारांचे मामेभाऊ)
दिग्विजय पाटील हे माजी मंत्री राणा जगजितसिंह यांचे चुलत भाऊ असल्याने या प्रकरणात राजकीय नातेसंबंधही जोडले गेले आहेत.
300 कोटींच्या व्यवहारावर लागणारी कोट्यवधींची स्टँप ड्युटी टाळण्यासाठी
Amadea Holdings LLP ने महाराष्ट्राच्या आयटी धोरणाचा आधार घेतला.
आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीला स्टँप ड्युटी माफ असते, जर प्रकल्प
“माहिती तंत्रज्ञान किंवा त्यास सहाय्यभूत सेवा” म्हणून पात्र असेल तर.
कंपनीने स्वतःला आयटी प्रकल्प म्हणून नोंदवून ही सवलत मिळवण्याचा प्रयत्न केला.
Amadea Holdings LLP (LLPIN: AAY-3559) ची स्थापना 27 डिसेंबर 2021 रोजी झाली.
कंपनीचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, पुणे येथे आहे.
कंपनीने शेवटचा वार्षिक आर्थिक अहवाल 31 डिसेंबर 2023 रोजी दाखल केला आहे.
कंपनीचा ईमेल: pdigvijay668@gmail.com
कंपनीचा वर्तमान स्थिती अहवाल: Active
या प्रकरणामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आर्थिक अनियमिततेचा तपास झाल्यास मुद्रांक शुल्क, मालकी हस्तांतरण आणि सरकारी सवलतींचा गैरवापर या सर्व मुद्द्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.