Virar Crime News Pudhari
पालघर

Virar Crime News: विरारमध्ये आई-मुलीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधाला विरोध

आरोपीने स्वतःवरही केले वार

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: विरार पश्चिमेतील गणपती मंदिर परिसरातील पूनम अंकाक्षा इमारतीत बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या कथित प्रेयसीसह तिच्या आईची हत्या केली आणि स्वतःवरही वार केले.

नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव येथे राहणारा शिवम उपाध्याय (27) हा लग्नाच्या चर्चेसाठी विरार पश्चिमेतील फ्लॅट क्रमांक 301 मध्ये आला होता. तिथे त्याची प्रेयसी नॅन्सी मिश्रा (24) आणि तिची आई सरिता मिश्रा (48) उपस्थित होत्या.

लग्नाला आईचा विरोध असल्याने तिघांमध्ये वाद इतका विकोपाला गेला की, शिवमने आधीच आखलेल्या योजनेनुसार फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला आणि घरातल्याच चाकूने आई-मुलीवर सपासप वार केले. त्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर शिवमने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

हल्ल्यादरम्यान फ्लॅटमध्ये मोठी झटापट झाली असून खिडकीच्या काचाही फुटल्या. तो आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना सतर्क केले. बोळींज पोलिसांनी अग्नीशमन कर्मचाऱ्यांच्या मदतीने खिडकीतून प्रवेश करून दरवाजा उघडला.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनास पाठवले आणि जखमी शिवमला संजीवनी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT