वसईत दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न उधळला pudhari photo
पालघर

Robbery foiled in Vasai : वसईत दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न उधळला

ज्वेलर्स दरोड्यातील दुकलीला काही तासांत अटक

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : वसईत कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी मांडलेला डाव अखेर गुन्हे शाखा कक्ष-4 ने उधळला असून दोन आरोपींना नाशिक येथून अटक केली आहे. वसईत दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानात घुसून दुकानदारावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 च्या पथकाने अवघ्या काही तासांत शोधून नाशिक मधून जेरबंद केले.

मंगळवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 11.57 वाजता वालीव येथील अंबिका ज्वेलर्स दुकानात फिर्यादी यांचे भाऊ कालुसिंग खरवट दुकानात असताना एक अनोळखी पुरुष व महिला लहान मुलासह दुकानात आले. अंगठी दाखवण्याचा बहाणा करत त्यांनी दुकानदाराला मुलासाठी पाणी आणायला सांगितले. दुकानदार दुकानातील आतील खोलीत गेल्याबरोबर पुरुष आरोपी त्याच्या मागे गेला आणि त्याच्यावर चाकूने सलग वार केले.गंभीर जखमा करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

घटनेनंतर गुन्हे शाखा कक्ष-4 च्या पथकाने तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा मागोवा घेत नाशिक रोड परिसरातून दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी सोहेल शराफत खान, फिरदोस बानो सोहेल खान त्यांच्या गुन्ह्यातील सक्रिय भूमिकेची खात्री पटल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी वालीव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पुढील आयुक्त निकेत कौशिक पोलीस अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोनि प्रमोद बडाख, सपोनि प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक,सफौ मनोहर तावरे, संतोष मदने,पो.हवा. शिवाजी पाटील, धनंजय चौधरी,प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी,रविंद्र भालेराव, आदी पथकाने ही कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT