Torgan Ghat Road Pudhari
पालघर

Torgan Ghat Road: तोरंगण घाट बनलाय मृत्यूचा सापळा; एकाच ठिकाणी शेकडो अपघात

पालघर - नाशिक मार्गावर पाच वर्षात 15 मृत्यू आणि 16 जखमी

पुढारी वृत्तसेवा

हनिफ शेख

पालघर: पालघर गुजरात सेलवासा वापी या ठिकाणाहून नावाजलेल्या त्र्यंबकेश्वर या जगभरात प्रसिद्ध असलेल्या देवस्थानाच्या ठिकाणी येण्यासाठी याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील औद्योगीकरणाला थेट तारापूर बोईसर अणुऊर्जा प्रकल्प आणि येथील मोठ्या प्रमाणावर असलेले औद्योगीकरण यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून नाशिक त्रंबकेश्वर जव्हार आणि पालघर याकडे पाहिले जाते.

कारण की कोकणात येणाऱ्या पालघर जिल्ह्याला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जाण्यासाठी एकमेव जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची निवड केली जाते तरीदेखील या महामार्गाकडे या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गेल्या काही वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग वर्ग झाल्याने या दोन्ही विभागाचे अश्रम्य दुर्लक्ष या घाटाकडे झालेले आहे कारण की या संपूर्ण 140 ते 150 किलोमीटर असलेल्या या रस्त्यातील मोखाडा ते त्र्यंबकेश्वर या 25 ते 28 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या तोरगण घाटाकडे अतिशय गांभीर्याने बघणे गरजेचे आहे कारण की सध्या हा घाट मृत्यूचा घाट म्हणून कुप्रसिद्ध व्हायला लागला आहे.

कारण की अगदी मोखाड्यापासून सुरू होणारा हा घाट त्र्यंबकेश्वर पर्यंत जातो. यामध्ये तोरंगण गावाजवळील घाटाला तोरंगण घाट असे म्हटले जाते. यावर अगदी आठवडाभरात एक ते दोन अपघात ठरलेलेच असतात याची मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहता विविध अपघातात तब्बल 15 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची आकडेवारी पहावयास मिळते.

यामुळे अपघातात एक मृत्यू झाला तरी त्या अपघाती ठिकाणाची अपघात प्रवण क्षेत्र म्हणून गणती होऊन त्या ठिकाणी विविध सुधारणा केल्या जातात. मात्र गेल्या फक्त पाच वर्षांची आकडेवारी पाहता पंधरा लोकांचा मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब असूनही आजवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या अपघात प्रवण क्षेत्रामध्ये अपघात थांबावेत यासाठी कसलीही वेगळी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालघर नाशिक जोडल्या जाणाऱ्या तोरंगण घाटामध्ये 2021 मध्ये 2मृत्यू, 2022 मध्ये 3 मृत्यू ,2023 सालात 3 मृत्यू 2024 3 मृत्यू आणि 2025 मध्ये 4 मृत्यू एकूण पाच वर्षात 15 मृत्यू झालं जी आकडेवारी उपलब्ध आहे. मात्र याआधी देखील काही महिन्यांपूर्वीच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारा एक आयशर ट्रक चा अपघात होऊन जवळपास 40 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

मात्र सुदैवाने किरकोळ जखमी शिवाय मोठी घटना घडली नाही. तर 2017 मध्ये या ठिकाणी एक भीषण अपघात झाला होता. यामध्ये एकाच अपघातात तब्बल 15 जखमी आणि 80 जणांचा मृत्यू देखील झाला होता.

खरंतर राज्यभरात दळणवळणाची सोय अधिक सुखकर व्हावी याशिवाय औद्योगिक आणि व्यावसायिक दृष्ट्या देखील प्रत्येक जिल्हा हा दुसऱ्या जिल्ह्याशी कनेक्ट व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि विविध महामार्ग यांची कामे सुरू तर काही नव्याने मंजूर देखील होत आहेत या सगळ्यांमध्ये पालघर जिल्ह्यात बोईसर या ठिकाणी असलेला अणुऊर्जा प्रकल्प तसेच त्या ठिकाणी असलेली औद्योगीकरण याला जोड म्हणून सध्या प्रस्तावित असलेले वाढवण बंदर, बुलेट ट्रेन प्रकल्प, याशिवाय वर्षभरात होऊ घातलेला त्रंबकेश्वर येथील कुंभमेळा या सगळ्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याला नाशिक जिल्ह्याची जोडणारा जो सध्याचा महामार्ग आहे हा अतिशय जवळचा मार्ग असल्याचे चित्र असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.

मुळात आता त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 2027 मध्ये कुंभमेळा असल्याने पालघर ते नाशिक हा रस्ता चौपदरीकरण होईल या सदर्भात हालचाली सुरू आहेत.यासाठीची काही ठिकाणी मोजणी देखील सुरू असल्याचे दिसून येते पालघर ते मोखाडापर्यंत आणि त्र्यंबकेश्वर ते नाशिक पर्यंत चौपदरीकरण होण्यास वाव आहे.

मात्र जो वीस ते पंचवीस किलोमीटरचा हा घाट रस्ता आहे. या ठिकाणी मात्र चौपदरीकरण होणे अतिशय कठीण आहे कारण की या संपूर्ण घाटात एकीकडे उंच डोंगर आणि दुसरीकडे मोठ्या दऱ्या निर्माण झालेल्या असल्याने या ठिकाणी बांधकाम विभाग नेमके काय उपाययोजना करते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे. मुळात या घाटामध्ये त्र्यंबकेश्वर कडून मोखाडाकडे येताना पालघर जिल्ह्याची हद्द सुरू होताच एक तीव्र उतार येतो या उताराला एक मोठे वळण आहे याच ठिकाणी शक्यतो ही अपघाताची मालिका सुरू असते कारण की त्र्यंबकेश्वर सोडल्यानंतर 7 किलोमीटर नंतर या तीव्र उताराला सुरुवात होते तिथून या तोरंगण गावाजवळील वळणावर येईपर्यंत 6 ते 7 किलोमीटर गाडी तीव्र उताराला चालत असते.

यामुळे या वळणा जवळ आल्यानंतर गाडी किंवा लोडिंग चे वाहन या वरील नियंत्रण बिघडण्याच्याच घटना जास्त घडतात त्यातून हे अपघात होण्याच्या घटना जास्त आहेत. नुसत्या पाच वर्षात 15 मृत्यू त्याआधी देखील अशा मोठ्या घटना घडलेल्या आहेत. असे असताना देखील या अपघाती भागात कोणतीही ठोस उपाययोजना सरकारकडून करण्यात येत नसल्याने लोकांच्या जीवाची काही किंमत नाही काय असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मदतकार्य, सुरक्षिततेची हमी असावी

त्र्यंबकेश्वर मोखाडा घाटातील हे जे अपघाती ठिकाण आहे ते त्र्यंबकेश्वर पासून आणि मोखाड्यापासून देखील किमान 12 ते 15 किलोमीटरच्या दुरीवर आहे यामुळे या ठिकाणी अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशन किंवा रुग्णालय यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा अडचणी येतात याशिवाय हा घाट रस्ता असल्याने या ठिकाणी बऱ्याचदा मोबाईल साठी नेटवर्क देखील नसते यामुळे देखील मदत कार्याला अडचणी होते याशिवाय रात्री अपरात्री जर हा अपघात झाला तर मोठ्या प्रमाणावर अडचणी अपघातग्रस्त लोकांसाठी निर्माण होतात याशिवाय जर एखादा मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्यास बऱ्याचदा लुटमार देखील झाल्याचे दिसून येते.

यामुळे या ठिकाणी मदत कार्य तात्काळ मिळावे यासाठी या भागात एक पोलीस चौकी असावी ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून मोखाडा वासिम करीत आहेत. याशिवाय या ठिकाणी एक कायमस्वरूपी रुग्णवाहिका देखील असावी अशी ही मागणी आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी अपघाताबरोबरच गाण्यावर दगडफेक झाल्याचे देखील अनेक घटना घडलेल्या आहेत यामुळे या अपघात प्रवण क्षेत्रामध्ये तात्काळ मदत कार्य आणि सुरक्षिततेची देखील हमी सरकारने द्यायला हवी.

पोलिसांच्या कल्पकतेने जीव वाचले

खरंतर एखाद्या अपघातप्रवण भागाची दुरुस्ती करणे हे बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे काम असते मात्र या तीव्र वळणावर होणाऱ्या अपघाताची संख्या लक्षात घेता मोखाडा पोलीस स्थानकाचे तत्कालीन एपीआय प्रदीप गीते यांच्या कल्पकतेने त्यांनी विविध लोकांचे सहकार्य घेऊन या वळणावर अतिशय मोठे मोठे असे मातीचे ढिगारे टाकण्यात आले होते.

यामुळे या तीव्र वळणावर आणि उतारावर नियंत्रण सुटलेली वाहने किंवा ब्रेक फेल झालेली वाहने अडून ती दरीत न जाता रस्त्यावरच उभी राहिली त्यातून अनेकदा जीवित हानी टळली मात्र या ठिकाणी एखाद्या गाडीचे ब्रेक फेल झाले तर ती गाडी आणावी यासाठी अनेक मोठ्या घाटांमध्ये रनवे ट्रॅक लेनची निर्मिती केली जाते त्या पद्धतीने या ठिकाणी तसा ट्रॅक निर्माण करावा अशी देखील मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT