Palghar SSC Result  Pudhari
पालघर

Palghar SSC Result | पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.९२ टक्के; वसई तालुका ठरला अव्वल

यंदाही जवळपास 95.18 % मुली उत्तीर्ण तर 90.89 मुले उत्तीर्ण

पुढारी वृत्तसेवा

Vasai Topped in Palghar SSC

पालघर : यंदा पालघर जिल्ह्यातील दहावीचा निकाल 92. 92 टक्के लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. फेब्रुवारी मार्च 2026 मधील घेण्यात आलेल्या दहावी माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील 31 हजार 965 मुले व 28 हजार 585 मुली असे एकूण 60 हजार 50 विद्यार्थी बसले होते.

त्यापैकी 29 हजार 54 मुले उत्तीर्ण तर 27 हजार 210 मुली उत्तीर्ण असे एकूण 56 हजार 264 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 90.89 % मुले आणि 95.18 % मुली असा एकूण 92.92 % निकाल पालघर जिल्ह्याचा लागला आहे यामुळे उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारी मध्ये यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

या निकालांमधील जिल्ह्यातील तालुका निहाय आकडेवारी पाहता वाळा तालुक्याचा निकाल ८८.३२, मोखाडा तालुका 92.47,विक्रमगड तालुका 91.98 जवाहर तालुका 87.39, तलासरी तालुका 87.85, डहाणू तालुका 89.55,पालघर तालुका 93.45 आणि वसई तालुका 94.46 असा एकूण जिल्ह्याचा 92.92 निकाल लागलेला आहे या निकालामध्ये वसई तालुका सर्वात अव्वल ठरलेला असल्याचे दिसून येत आहे.

या परीक्षेस एकूण 60 हजार 938 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 60हजार 50 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 56,264 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

तालुका निहाय अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये चांगले यश संपादन केले असून जिल्ह्यातील अनेक शाळांचा निकाल लक्षणीय आहे यामध्ये काही शाळांचा निकाला १००% देखील लागल्याचे दिसून आले आहे. माध्यमिक शिक्षणाचा पाया म्हणून या दहावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना बोर्डची परीक्षा त्याचे नियम याचा पहिल्यांदाच अनुभव येत असतो. यामुळे ही परीक्षा तशी अतिशय महत्त्वाची समजली जाते. मात्र, यामध्ये जिल्ह्यातील निकाल अतिशय अभिनंदन लागल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT