Local Train Pudhari
पालघर

Railway Ticket Checking: पालघर स्थानकासह विरार-पालघर मार्गावर विशेष तिकीटतपासणी; ८७४ प्रकरणांत ३ लाख ९४ हजार ४७५ रुपयांची वसुली

विरार-पालघर रेल्वे मार्गावरही तपासणी; अनियमित प्रवास आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सफाळे: पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडल प्रशासनातर्फे पालघर रेल्वे स्थानक तसेच विरार ते पालघर रेल्वे मार्गावर १ ऑक्टोबर रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ८७४ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, ३ लाख ९४ हजार ४७५ रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल तसेच लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त सहभागातून ही कारवाई करण्यात आली.

विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणे तसेच रेल्वेच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली.

दरम्यान, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा तसेच रेल्वेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भविष्यातही विरार ते डहाणू रोडदरम्यान नियमित तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT