मोखाडा : तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गाव पाड्यांची आणि त्या परिसरातील गावपाड्यांसाठी आरोग्यवस्था नसल्याने त्यांना किरकोळ आजारासाठी सुद्धा नांदगाव किंवा खोडाळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता अशावेळी या परिसरात एक उपकेंद्र व्हावं ही मागणी जोर धरत होती. अशावेळी शासनाकडून उपकेंद्र मंजूर सुद्धा झालं .मात्र गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध नसल्याने केंद्र रखडले होते. मात्र तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते विठ्ठल चोथे यांनी या जागेसाठी मोठे प्रयत्न केले. ही जागा दान करणाऱ्या मोडक कुटुंबांची देखील संवाद साधून या प्रयत्नांना यश मिळवत सदरची जागा थेट शासनाच्या नावे झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
हे उपकेंद्र लवकरात लवकर येथील आदिवासी बांधवांच्या सेवेत यावं यासाठी पुढील कार्यवाही होणे आवश्यक असतानाच दीड कोटींपेक्षा अधिक रकमेच्या इमारतीला कार्यारंभ आदेश मिळाल्याचे देखील आता दिसून येत आहे. तर उपकेंद्रासाठी मिळालेल्या जागेची मोजणी देखील नुकतेच झाल्याचे चित्र आहे.
यामुळे येथील बांधवांनी चोथे यांचे आभार देखील मानले आहेत. दोन वर्षांपूर्वी कुर्लोद येथे उपकेंद्र नसल्याने येथील एका महिलेला आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी चक्क वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागला होता. यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत या गावाला तात्पुरत्या स्वरूपात बोटी देखील मिळवून दिल्या होत्या. तर या गावाला जोडणारा पूर्वा यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागात मोठा पूल मंजूर करून तो आज घडीला पूर्णत्वास देखील आला आहे. यामुळे दर पावसाळ्यात संपर्क तुटणारे गाव आज जगाच्या संपर्कात आले आहे. या दळणवळणाच्या समस्या मिटल्यानंतर आता या भागातील आरोग्याची समस्या देखील मिळणार आहे. उपकेंद्राला मिळालेली जागा याशिवाय इमारतीला मिळालेला कार्यारंभ आदेश आणि त्यावर तातडीची होत असलेली कार्यवाही हे पाहता लवकरच या गावाच्या आरोग्यवस्थेसाठी हे उपकेंद्र उभारले जाणार आहे.