Palghar Illegal Beef Transport  Pudhari
पालघर

Palghar Crime | मनोर डोंगरी परिसरात गोमांसाची वाहतूक करणारे वाहन जप्त

मनोर डोंगरी (टेकडी) येथे गोमांस तस्करीवर एलसीबी व मनोर पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Palghar Illegal Beef Transport

पालघर: पालघर जिल्ह्यातील मनोर डोंगरी (टेकडी) परिसरात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व मनोर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी व यशस्वी कारवाई करत गोमांसाची वाहतूक करणारे संशयित वाहन ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून गोमांसाची अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानुसार एलसीबी व मनोर पोलिसांनी संयुक्त सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले असून गोमांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईमुळे गोमांस तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, एलसीबी व मनोर पोलिसांच्या संयुक्त कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून, तपास अधिक वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT