Palghar Liquor Seizure pudhari photo
पालघर

Palghar Liquor Seizure : पालघरमध्ये दमण बनावटीचा मद्यसाठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाची जव्हारमध्ये कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पालघर : दमन बनावटीचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.जव्हार तालुक्यातील बोरोळे गावाच्या हद्दीत केलेल्या कारवाईत केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन मिळून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी विरोधात दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाईमुळे केंद्र शासित प्रदेशातून होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आणि डहाणू विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२५)जव्हार तालुक्यातील बोरोळे-बडापाडा रोडवर सापळा रचला होत. यावेळी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. या कारवाईत केंद्रशासित प्रदेशातील विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा १७२.८ बल्क लिटर आणि बिअरचा १४४ बल्क लिटर असा एकूण ३१६.८० बल्क लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला.

मद्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. जप्त मद्याची किंमत २ लाख १९ हजार रुपये असून, जीपची किंमत १० लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १२ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाहन चालक रमेश बुध्या गोविंद (४०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमावर्ती केंद्रशासित प्रदेशांतून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT