Gambling Raid Pudhari Photo
पालघर

Palghar Gambling Raid : दुर्वेसमध्ये जुगार अड्ड्यावर मनोर पोलिसांचा छापा

दहाजणांना रंगेहाथ पकडले, हजारोंचा मुद्देमाल हस्तगत; पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पालघर : मनोर पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्याविरोधात मोठी कारवाई करत पालघर तालुक्यातील दुर्वेस येथे तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.कारवाईत रोख रक्कम आणि पत्त्यांचे दोन कॅट असा एकूण ६९ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावातील एका वाडीतील एका खोलीमध्ये तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. या खोलीला पडदे लावून तसेच चादरी टाकून बाहेरील व्यक्तींना संशय येऊ नये, अशा पद्धतीने जुगाराचा डाव रंगला होता. मनोर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, खोलीमध्ये दहा जण पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतचा जुगार खेळताना आढळून आले.

त्यांच्या समोर पत्त्यांची पाने आणि रोख रक्कम असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेत रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात आलेले पत्ते जप्त केले.याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT