खानिवडे : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे प्रकटीकरण शाखा-2 वसई,माणिकपूर , वालीव व अचोळे या पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या 11जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिासांच्या माहितीनूसार 9 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा कक्ष 2 वसई कार्यालयालाला मिळालेल्या माहितीनूसार 8 ते 10 जण वसई पूर्वस्थीत परीसरातील एका बंगल्यावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने अग्नीशस्त्र व इतर घातक हत्यारांसह एका फॅब्रीकेशन गाळयासमोर एकत्र येणार असल्यावाचत बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष 2 वसई , माणिकपुर पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे व आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीक कारवाई करीत रात्रीच्या सुमारास एका दुकाना समोर सापळा रचत 11 आरोपीना ताब्यात घेण्यात आले. यावेळी घेतलेल्या झाडाझडतीत त्यांच्याकडे गावठी कट्टा, व इतर अनेक प्राणघातक शस्त्रे ताब्यात घेण्यात आले आहे.
कुमार साबळे (29) ,ईब्राउद्दिन ईब्रार चौधरी (24) कार्तिक कुमार सुशील सिंग (24)गुरुप्रितसिंग अजित सिंग लबाना ऊर्फ चच्या (30) कैलास चिखले (51) विष्णु खरात (21), सचिन भालेराय (26) विक्रम बाळकृष्ण हरिजन (22) रमजान शब्बीर कुरेशी (24) गणेश भोसले (30) गणेश अशी अटक 11जणांची नावे आहेत. ही टोळी वसई पूर्व परीसरातील एका बंगल्यावर दरोडा घालण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले.
वरील हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सराईत गुन्हेगार असून त्यांच्या कब्जातून 1 देशी बनावटीचा कट्टा, 4 जिवंत काडतुसे, पिस्टल आकाराचा लायटर, प्लॅस्टीक दोरी, चॉपर, चाकू, कटाचण्या, हातोडी, मिरची पावडर, मोबाईल फोन, रेल्वे तिकिटे, रोख रक्कम व ईतर साहीत्य असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.