Raigad Accident: कशेडी घाटात इको कार संरक्षण भिंतीवर धडकून पलटी; एक ठार, 5 जखमी

Kashedi Ghat car accident: इको कार मुंबईकडून गोव्याकडे जाताना ही अपघात दुर्घटना घडली आहे
Raigad Accident
Raigad Accident
Published on
Updated on

धनराज गोपाळ

पोलादपूर: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणाऱ्या इको कारला अपघात होऊन कार पलटी झाली. या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. भोगाव हद्दीत गुरुवार (दि.१०) पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इको कार चालक लिंगप्पा कंटेपा पातारे (वय २८, रा. निगडी, पुणे) आपल्या ताब्यातील इको कार (क्रमांक एम एच १४ के एस ०२३१) घेऊन मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जात होते. दरम्यान कशेडी घाटात भोगाव हद्दीत भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार पुलावरील कठड्यावर आदळून पलटी झाली. या अपघातात १ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत.

या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५, रा.-चहोली ता. हवेली जि. पुणे) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोहन गोरोबा चव्हाण (वय ४२), धनराज प्रभाकर मगर (वय ४२), विकास शंकर चव्हाण (वय १८), नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे (वय ३५), निंगप्पा कंटप्पा पातारे (वय २८) सर्व राहणार पुणे विभाग हे पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी गंभीर दुखापत झालेल्या तिघांवर कळंबनी खेड उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. तर दोघे किरकोळ जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले आहेत.

या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सर्णेकर, ठाणे अंमलदार सतीश कदम, पो. हा. नितेश कोंढाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविले. यासह कशेडी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय गीमवणेकर, हेड कॉ. माजलकर, सोडमीस, चाटे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले व वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची पोलादपूर पोलीस ठाण्यात रजि. नं.५१/२०२५ भा. न्या. स. कलम १०६(१),२८१,१२५(अ),१२५(ब) मो. वा. का. क.१४८ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास ठाणे अंमलदार सतीश कदम हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news