Galai Devi Temple Pudhari
पालघर

Galai Devi Temple: हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळते, अशी श्रद्धा! नावजेच्या गैलाई देवीचे महत्त्व जाणून घ्या

वैतरणा नदीच्या काठावरील उंच टेकडीवर मंदिर; नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद पाटील

सफाळे: हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नावजे गावच्या श्री गैलाई देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वैतरणा नदीच्या रमणीय काठावर वसलेल्या या गावात, उंच टेकडीवर श्री गैलाई देवीचे सुंदर मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

देवीवरील अपार श्रद्धा आणि निस्सीम भक्तिभावामुळे या देवस्थानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. नावजे परिसरात श्री गैलाई देवीची महती मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. हरवलेली मौल्यवान वस्तू किंवा गमावलेले वैभव देवीच्या कृपेने पुन्हा प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचे योगदान

श्री गैलाई देवीच्या आशीर्वादाने गावात विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करतात. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन काम करतात.

धार्मिक श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड देत गावाने विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. वैतरणाच्या काठावर निसर्गरम्य परिसरात देवीच्या मंदिरामुळे गावाला विशेष ओळख मिळाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT