Power Cut In Vasai-Virar
मनवेलपाडा : वसई -विरार महापालिका हद्दीत नालासोपारा पूर्व शहरी भागात चक्क दोन दिवस अंधाराखाली गेल्याची घटना घडली. या परिसरात झपाट्याने नागरिकरण झाल्याने लोकवस्ती प्रचंड प्रमाणात आहे.
मोरेगाव व नगीनदास पाडा या परिसरात दोन दिवस व रात्र वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नालासोपारा भागातील हे रहिवासी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत.
शनिवारी रात्री दीड वाजता वीज पुरवठा बंद झाला. तो रविवारी दुपारी 2 च्या सुमारास सुरू झाला. तर रविवारी रात्री 12 वाजता वीज गेली ती पहाटे 4 वाजता आली.