

Wildlife Accident
पालघर : सफाळे रेल्वे स्थानकालगतच्या स्वर्गीय काळुराम धोडदे उड्डाणपुलावर कोल्ह्याचा (गोल्डन जंकेल) मृतावस्थेत आढळून आला. सफाळे वनपरीक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी मृत कोल्ह्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाकडून अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कोल्हाच्या मृतदेहाची प्राथमिक तपासणी आणि शविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे यांनी केली.
सफाळे परिसरात कांदळवन असल्याने कोल्ह्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून आलेले नाही. दोन महिन्यापूर्वी सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील मांडे येथे कोल्हा मृत झालेला आढळून आला होता अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे यांनी दिली.
मृतावस्थेत आढलेला कोल्हा भारतात आढळणाऱ्या आणि सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या सस्तन प्राण्यांपैकी एक आहे. सोनेरी कोल्हा (कॅनिस ऑरियस) हा देशात अत्यंत व्यापक प्रमाणात आढळणारा कॅनिड आहे. यांची उपप्रजाती म्हणजे इंडियन कोल्हाळ कोल्हे हे कुत्र्यासारखे दिसणारे प्राणी असून खूप हुशार असल्यामुळे, त्यांचा उल्लेख अनेक आफ्रिकन लोककथांमध्ये आढळतो.
नर आणि मादी कोल्हे एकत्र शिकार करतात, त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करतात आणि कुटुंब वाढवताना कामे देखील विभागतात, नर कोल्हे जिथे मादी बाळाला जन्म देते तिथे खड्डा खोदतो आणि दोघे त्यांचे कुटुंब वाढवतात. कोल्हे नर आई आणि गुहेत राहणाऱ्या पिलांचे रक्षण करतात. कोल्हे हे सहसा निशाचर सस्तन प्राणी असल्यामुळे रात्री सक्रिय असतात. दुर्गम भागातील काही कोल्हे दिवसाच्या थंड वेळेत अधिक सक्रिय असतात. भारतीय कोल्हा संध्याकाळीच त्याच्या गुहेतून बाहेर पडतो.