जालन्यात छुप्या दारू भट्टीवर कदीम पोलिसांचा छापा file photo
पालघर

Crime News: नालासोपारा पूर्वेतील तरुणाची निर्घृण हत्या; खूनप्रकरणी चौघे गजाआड; मुख्य साथीदार अद्याप फरार

गँगवॉरच्या वैराचा बळी?

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: नालासोपारा पूर्वेतील आचोळे-डोंगरी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर एका आरोपीचा अद्याप शोध सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रवि बिडलान याचे रोहन संजय जगदाळे ऊर्फ टायगर, करण अवसरमल, उत्कर्ष आनंद अवसनकर, शक्ती सिंग आणि सुमित आझाद सारसर ऊर्फ बाव यांच्याशी जुने वैमनस्य होते.

दोन्ही गटांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते आणि परस्परांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी रवि बिडलान याने रोहन ऊर्फ टायगर याला कथितरित्या हातपाय बांधून मारहाण केली होती. या घटनेनंतर दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र झाला होता. त्यातूनच सूडाच्या भावनेने कट रचून रवि याची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मित्र अंशु आणि दीपक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर फिर्यादी पवन बिडलान यांचा संशय बळावला. पूर्ववैमनस्यातून रोहन ऊर्फ टायगर, करण, उत्कर्ष, शक्ती सिंग आणि सुमित ऊर्फ बाव यांनी संगनमताने रवि बिडलान याचा खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत 5 जून 2026 रोजी रात्री रोहन संजय जगदाळे ऊर्फ टायगर, करण अवसरमल, उत्कर्ष आनंद अवसनकर आणि सुमित आझाद सारसर ऊर्फ बाव यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी शक्ती सिंग (वय 28) हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.

मारहाणीच्या घटनेतून पेटला सूडाचा वणवा

मृत रवि बिडलान आणि आरोपी रोहन ऊर्फ टायगर यांच्यातील जुन्या वादाला काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित मारहाणीची भर पडली होती. त्यानंतर वाढलेल्या वैरातूनच खुनाचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस या दृष्टीने तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT