Mokhada civic issues pudhari photo
पालघर

Mokhada civic issues : मोखाडा नगरपंचायतीचे कचरा व्यवस्थापन बिघडले

घंटागाडीच्या फेरीसाठी लागतात पाच ते सहा दिवस

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा : मोखाडा शहराच्या विकासासाठी असलेली मोखाडा नगरपंचायतीचे व्यवस्थापन सध्या बिघडले असल्याचे दिसून येत असून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होईपर्यंत जुनी पाणीपुरवठा योजना कमी क्षमतेची असल्याने एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आतापर्यंत मोखाडा शहरवासीयांनी सहन केला मात्र आता घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या घंटागाडीची ही तीच अवस्था झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

प्रत्येक घरातील कचरा दररोज निघतोच मात्र तरीसुद्धा एक दिवसाआड कचरा गाडी ही त्या त्या विभागात फिरत होती मात्र आता काही विभागात हीच घंटागाडी येण्यासाठी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांनी कचरा टाकायचा कुठे असा सवाल आता नगरपंचायतीला विचारला जात आहे.

घंटागाडी दररोज दारात येत असल्याकारणाने कुठेही कचरा साठवण्यासाठी कचराकुंड्या नगरपंचायतीकडून देण्यात आलेल्या नाहीत यामुळे कचरा फेकण्यासाठी सर्वस्वी या घंटागाडीवर अवलंबून राहावे लागते मात्र हीच घंटागाडी आठवडाभरानंतर दारात जाणार असेल तर कचरा नेमका साठवायचा कुठे याचे उत्तर नगरपंचायतीने देणे गरजेचे आहे.

2022 मध्ये राज्यभरात नगरपंचायतीच्या के आर ए मूल्यमापन गटांमध्ये शहर सुधारणा व सौंदर्यकरण स्पर्धा मध्ये मोखाडा नगरपंचायतीचा राज्यात चौथा क्रमांक आला होता. मात्र आज मोखाडा नगरपंचायतीच्या ढिशाळ कारभारामुळे या तक्रारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुळात कोणत्याही शहरात किंवा ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन हाच शहराच्या विकासाचा प्रमुख गाभा असतो त्यावरूनच शहराचा विकास ठरत असतो.

यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणताही पुरस्कार भेटल्यानंतर त्या व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक वाढून त्याबाबतच्या उपाययोजना या शाश्वत आणि दीर्घकालीन टिकवने महत्त्वाच असते मात्र मोखाडा नगरपंचायतीने आपला ढिसाळ कारभार दाखवून नाराजी ओढून घेतली आहे. स्वतःचा गण कचरा प्रकल्प असलेली राज्यातील पहिलीच नगरपंचायत म्हणून देखील मोखाडाची ओळख आहे यासाठी सुरुवातीला घंटागाड्या देखील घेण्यात आल्या आणि मोखाडा शहर आणि 13 पाढे मिळून हे कचरा व्यवस्थापन सांभाळलं जातं मात्र सुरुवातीचे काही दिवस सोडल्यास त्यानंतर या घंटागाड्या एक दिवसाआड पाठवण्यास सुरुवात झाली.

एकही आंदोलन व मोर्चा नाही

जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपरिषदा,नगरपंचायती,अशा प्रत्येक कार्यालयात सत्ताधारी विरोधात विरोधक असा सामना पहावयास मिळतो मात्र याला अपवाद ठरलेली राज्यातील एकमेव मोखाडा नगरपंचायत असावी कारण या नगरपंचायतीचा कालावधी संपायला काही महिनेच बाकी आहेत मात्र या कालावधीत विरोधकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर आक्षेप घेतला किंवा आंदोलन की मोर्चा काढला असे एकदाही झाले नाही.

काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत सगळ्यांना याबाबतचा विभाग आणि रूट ठरवून दिलेला आहे मात्र आपल्या तक्रारीची दखल घेऊन मी याबाबत समज देतो.
रीतेश बैरागी, मुख्याधिकारी - नगरपंचायत मोखाडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT