मोखाडा : मोखाडा त्रंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात एक आयशर ट्रकचा मोठा अपघात झाला असून यामध्ये प्रवासी असलेल्या सुभाष दिवे (२८) मु.हाडे जव्हार याचा जागीच मृत्यू झाला आहे तर 30 हूनअधिक जखमही झाले. हे सर्वजण मजुरीच्या शोधात निघाले होते.
गंभीर जखमींना उपचारासाठी त्रबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील काहींची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे तर काहींना मोठ्या प्रमाणावर मुका मार लागल्याचे दिसून येत आहे यातील सर्वच जखमींची नावे अद्याप कळाली नसली तरी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मात्र एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले
याबाबत प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत असतात अशावेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका आयसर ट्रक मध्ये तब्बल पन्नास हून अधिक मजूर बसले होते यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री आठ वाजता घडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील एकाच्या जागीच मृत्यू झाला आहे तर 40 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलविण्यात आले आहे.
मोखाडा तालुक्यात सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठे असताना आता दररोजचे स्थलांतर सुद्धा वाढले आहे यासाठी मोखाड्यातील अनेक मजूर मोखाडा त्रंबक रस्त्यावरील अनेक फाट्यावर येऊन उभे राहतात कमी भाड्यामध्ये गाड्या मिळव म्हणून मालवाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात आणि येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा ते जर दिवशी आधार घेत असतात त्यातूनच आज अशाच एका वाहनात प्रवास करत असताना हा मोठा अपघात झाला आहे यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर रोजगार नाही दुसरीकडे रोजगारासाठी आपला जीव दररोज धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
मोखाडा ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाचा सूचकपणा कौतुकास्पद
या घटनेची माहिती मिळताच मोकळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भरत महाले यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर हा संदेश टाकून तातडीने उपचारासाठी सज्ज राहण्याच्या आव्हान केले याला प्रतिसाद देत ज्या नर्सेस यांची ड्युटी संपलेली होती.जे डॉक्टर ड्युटी संपवून घरी गेले होते ततो सर्वच्या सर्व स्टाफ रुग्णालयात तात्काळ हजर झाला. यावेळी अनेक डॉक्टरांनी,नर्सेस यांनी इमर्जन्सी म्हणून आहे त्या अंगावरील पोशाखासह रुग्णालय गाठले.यामुळे अनेकांवर वेळेत उपचार करणे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या या समय सूचक तेचे कौतुकही करण्यात येत आहे.