तलासरी : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र गुजरात सीमा वाद सुरू असून आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडे घेतल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.इंचभरही महाराष्ट्राची जमीन गुजरातला देणार नाही असा इशारा अविनाश जाधव यांनी दिल्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
10 डिसेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्र शासनाकडून संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात हद्द निश्चित होण्याची चिन्ह निर्माण झाल्याचे असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याने. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र गुजरात शासनाकडून संयुक्त मोजणी सुरू करून सिमा निश्चितीचा प्रश्न शासन पातळीवर संयुक्तपणे सोडवण्याच्या हालचाली सुरू झाले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याने. नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील वेवजी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी गुजरात कडून महाराष्ट्राच्या हद्दीत ऊस कोणी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांशी बोलताना टेन्सभर हे महाराष्ट्राची जमीन गुजरातला देणार नाही असा इशारा देत येथील स्थानिक नागरिकांना गुजरात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर संताप व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाने सीमावाद तातडीने सोडवला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सीमा वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र गुजरात सिमेंट भागाचे पाहणी केल्यानंतर झाईबोरी गाव येथे भेट देऊन तलासरी तहसीलदार अमोल पाठक यांची भेट घेऊन सीमा वादाबाबत माहिती घेत चर्चा केली. पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायत वेवजी गावाच्या हद्दीत गुजरात राज्यातील उंबरगाव येथील सोलसुंभा ग्रामपंचायतीने सुमारे आठशे मीटर ते एक किलोमीटर आत महाराष्ट्रातील वेवजी गावच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचे हे प्रकरण आहे.
तलासरी- उंबरगाव राज्यमार्गावर महाराष्ट्र राज्याच्या सर्वे नं 204 ला जोडतो. या दोन्ही राज्यांची अद्याप सीमा (हद्द) कायम न झाल्याने महाराष्ट्र सिमेतील 1000 मिटर गुजरात राज्याकडून अतिक्रमण झाल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. यावरून गुजरात महाराष्ट्र राज्याच्या (सीमा) हद्दीबाबत बराच काळापासून वाद सुरू आहे. 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र गुजरात राज्यांनी संयुक्त मोजणी सुरू करून सीमा वाद निकाली काढण्याचे काम सुरु असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या सीमा वादात उडे घेतल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.