जव्हार: जव्हार दाबोसा धबधबा सध्या पाऊसामुळे ओसांडून वाहू लागला आहे, त्यात शनिवार, रविवारी पर्यटकांची गर्दी वाढते आहे, मात्र दाबोसा धबधबा ठिकाणी यावर्षी बांधकाम विभागाने नव्याने उभारलेले स्कायवॉक पर्यटकांच्या मागणी नुसार येत्या २९ जुलै पासून पर्यटकांसाठी खुले करणार असल्याचे, बांधकाम विभागाच्या माहितीनुसार आमदार हरिश्चंद्र भोये यांनी सांगितले.
आमदार हरिश्चंद्र भोये यांनी रविवारी भेट दिली त्यावेळी शेकडो पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळाली, मात्र त्या ठिकाणी चार चाकी, दुचाकी वाहन वाहनांना पार्किंग नसल्यामुळे, काही तास गाड्या पार्किंग करण्याकरिता मोठी अडचण असल्याचे रविवारी पाहायला मिळाले.
त्यावेळी आलेल्या पर्यटकांसाठी पार्किंगच्या अनेक अडचणी आल्या, नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवॉकमुळे पुढे मोठी गर्दी होईल, त्यासाठी पार्किंग व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे, यावेळी संबंधित विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी रविवारी तात्काळ भेट देऊन दाबोसा धबधबा जवळील बांधलेल्या स्कायवॉकची पुन्हा एकदा पाहणी करून पर्यटकांची अडचण समजून घेतल्या.
स्कायवॉक २९ जुलैपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असून, त्यामुळे जव्हारच्या पर्यटनाला नवी चालना मिळेल, तसेच स्कायवॉक सुरू झाल्यानंतर पर्यटकांना निसर्गरम्य परिसराचा वेगळ्या उंचीवरून आनंद घेता येणार असून, स्थानिक रोजगारालाही त्याचा फायदा होणार आहे.
यामुळे शनिवार, रविवार या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दाबोसा धबधब येथे यावर्षी बांधलेल्या स्कायवॉकच्या पाहणी करिता स्थानिक पातळीवर रविवारी दिलेल्या भेटीत दरम्यान आमदार हरिश्चंद्र भोये, कार्यकर्ते अशोक चौधरी, राजू भोये, आदी मान्यवरांनी भेट देऊन पुन्हा येथील परिसराची चाचपणी केली.
रोजगाराला हातभार
दाबोसा धबधबा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बनविलेले स्कायवॉक येत्या २९ जुलै पासून पर्यटकांसाठी खुले करणार असल्याचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी सांगितले, स्कायवॉकमुळे या वर्षापासून पर्यटकांची अजून गर्दी वाढेल असे, तसेच रोजगार देखील वाढेल असे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी सांगितले.