Jawhar FDR Case Pudhari
पालघर

Jawhar FDR Case: एफडीआर खरा की बोगस? जव्हारच्या बांधकाम विभागातील कोट्यवधींच्या प्रकरणावर प्रश्नचिन्ह

एफडीआर घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंब, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

हनीफ शेख

पालघर: जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांचे अनेक भ्रष्टाचार दिवसेंदिवस समोर येत असताना यामध्ये ज्या प्रमाणात अनेकदा ठेकेदारांना दोषी ठरविण्यात येते आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर मात्र ठोस कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे.

सध्या याच सार्वजनिक बांधकाम विभागात आठ ते नऊ कोटींचा एफडीआर घोटाळा आता समोर आला आहे.

मुळात आपण करीत असलेल्या कामाच्या मोबदल्यात काही सुरक्षा ठेव रक्कम ही बँकेत भरून तसा एफडीआर त्या कामांच्या फायदे मध्ये जोडावा लागतो ज्या प्रमाणात काम कमी दराने भरले जाईल तशी ती रक्कम वाढत जाते.

यानंतर काम पूर्ण झाल्याच्या काही कालावधीत हे एफ डी आर संबंधित ठेकेदाराला परत केले जातात मात्र या प्रकरणात हे एफ डी आर एस बोगस असल्याचे आता समोर आले आहे.

मुळात हे प्रकरण 2019-20 चे असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे एफ डी आर खोटा की खरा ही तपासण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे की बँकेची हा खरा सवाल उपस्थित होत आहे.

मुळात हे एफडीआरचे एक प्रकरण समोर आले असले तरी अशी अनेक प्रकरणे त्यावेळी झाली असण्याची शक्यता आहेत कारण की जव्हार बांधकाम विभागात अनेकदा कामे कमी दराने भरण्यासाठी स्पर्धा लागलेली असते.

अशावेळी मोठ्या रकमेचा एफ डी आर यासाठी भरावा लागतो हे पैसे वाचावे म्हणून थेट स्टेट बँक ऑफ इंडिया चे बोगस एफ डी या टेंडर फाईलला जोडल्याचे हे प्रकरण समोर आले आहे.

आजवर या एफ डी आर संबंधी खात्री कधीच करण्यात आली नाही कारण की काम पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या काळात हे एफ डी आर ठेकेदाराला पुन्हा परत केले जातात यामुळे यामध्ये थेट शासनाचे पैसे गुंतविण्याचा संबंध नसतो कारण की ते पैसे संबंधित ठेकेदाराचे असतात मात्र ठेकेदारांकडून एफडीआर चे पैसे वाचावे म्हणून बोगस एफडीआर जोडून वर्षानुवर्षे अशी कामे केली गेली ही एक प्रकारची मोठी फसवणूकच आहे.

यामुळे हे एफडीआर खरे की खोटे हे तपासणे संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य असताना या आधीच्या ही दोन प्रकरणात फक्त ठेकेदारावर कारवाई करून प्रकरण संपवली जातात. मात्र आता यामध्ये अधिकाऱ्यांची देखील उच्चतरीय चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सर्वात महत्त्वाची म्हणजे या प्रकरणाची कुंकुम संबंधित ठेकेदाराला लागतात त्यांनी चक्क सरकारी कार्यालयात घुसून दिवसाढवळ्या त्या फाईल मधील एफडीआर गायब केल्याची तक्रार एका वरिष्ठ लिपिकाने पोलिसात दाखल केली आहे यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.

जव्हार सा.बां. विभागाचा हा सावळा गोंधळ नेहमीचाच

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाज किती भ्रष्ट आहे हे पहावयाचे असल्यास जेव्हा कामांची बिले येतात तेव्हा या ठिकाणी सावळा गोंधळ पहावयास मिळतो. आज फाईल मधली कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार केली असली तरी अनेकदा अशा टेंडर फाईल किंवा कामांच्या बिलांच्या फायल ह्या ठेकेदारांच्या घरी देखील जातात असे चित्र आहे. आणि याला अनधिकृत रित्या या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची मुकसंमती देखील असल्याचे दिसून येते.

मुळात जी कामे शासकीय अधिकाऱ्यांनी करावयाची असतात ती निम्म्यापेक्षा जास्त कामे ठेकेदारच करीत असतो अगदी अंदाजपत्रके बनवण्यापासून बिल बनविण्याची कामे देखील बाहेरच्या यंत्रणेकडून केली जातात मग येथील अधिकारी नेमका पगार कशाचा घेतात हा देखील संशोधनाचा विषय आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT