जव्हार ः जव्हार नगरपरिषदेची निवडणूक मोठ्या अटीतटीत भाजपा, शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या तिरंगी लढत बघायला मिळाली, त्यात वर्षानुवर्षांची राष्ट्रवादी काँग्रेस सेनेची सत्ता मोडीत काढत भाजपाने नगराध्यक्षांसह 14 नगरसेवक विजयी मिळवत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, मात्र आता निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी उप नगराध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्व जव्हारकरांचे लक्ष लागले आहे.
ह्या निवडून आलेले नगरसेवक सर्वच आपआपल्या पद्धतीने उपनगराध्यक्ष मिळवण्याकरिता प्रयत्नशील आहेत. नुकतेच जव्हार नगरपरिषदेवर निवडून आलेल्या नगराध्यक्षा पूजा उदावंत ह्या थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांतून उपनगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने, जव्हार नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष कोण? याकडे जव्हारवासीय नागरिकांचे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्षसाठी निवडून आलेले नगरसेवक यामध्ये अनेकांची नावे चर्चेत असली तरीही आप आपसात रस्सीखेच सुरू आहे. त्यातच उपनगराध्यक्ष कुठल्या जातीला किंवा आदिवासी समाजाला देतात हा मूळ मुद्दा आहे.
मात्र सध्यातरी उप नगराध्यक्षसाठी सचिन सटानेकर यांचे नाव पुढे चर्चेत असले तरीही अनेक जातीपातीच्या अडचणींमुळे उपनगराध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष लागले आहे. जव्हार हया जुन्या संस्थानकालीन नगरपरिषदेवर काही वर्षानंतर भाजपा सरशी ठरला आहे, त्यामुळे उपनगराध्यक्षांची माळ कुणाच्याही गळ्यात पडो पक्षाचे नेतृत्व आम्हाला मान्य असेल असेही काही नगरसेवकांनी सांगितले. परंतु भाजपाने एकहाती सत्ता खेचून आणली तरीही उपनगराध्यक्ष कोण? याकडे सर्वच जव्हारकरांचे लक्ष लागून आहे.
मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक हे आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष हे आदिवासी समाजाला देतात की काय? हे पक्ष श्रेष्टीतील अनुभवी उमेदवाराला देतात हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे सर्व जव्हारकरांचे लक्ष उपनगराध्यक्ष कडे लागले आहे.