पालघर: मागील अडीच तीन वर्षांपासून बहुचर्चित असलेल्या जल जिवन मिशन योजनेतून ग्रामीण भागातील गाव पाड्याची पाणी टंचाई कायमची संपुष्टात येईल याच वावडे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी उठले होते.
परंतू धामणशेत ग्रामपंचायत मधील सोनारवाडी या सव्वाशे लोकवस्ती असलेल्या पाड्यात अगदी 100 मीटरच्या अंतरावर तीन पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसून येतात.
यातील एक सर्वात जुनी त्यानंतर एक कोटीपेक्षा जास्त रक्कम वापरून केलेली दुसरी पाण्याची टाकी आणि आता नव्यानेच जलजीवन योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेली तिसरी पाण्याची टाकी एवढ्याशा गावात जर पाणीपुरवठ्याच्या तीन योजना असल्याच्या पाऊलखुणा असूनही येथील लोकांना टँकरची वाट पाहत बसावे लागत आहे.यामुळे अगदी गावात तीन टाक्या तरीही घशाची कोरड मात्र कायम असल्याचे विदारक चित्र येथे स्पष्ट दिसत आहे.
मोखाडा आणि पाणीटंचाई यांचे समीकरण काही केल्या तुटत नसल्याचे चित्रे आहे.आतातर तब्बल 300 कोटीहून अधिक निधी खर्चून जलजीवन योजना राबविण्यात आली आहे.मात्र निधीची कमतरता असल्याने अनेक योजनांची कामे रखडली आहेत. मात्र असे करताना सगळा दोष जलजीवन योजनेवर टाकण्याआधी काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून ज्या योजना झाल्या त्याच्या अपयशाबद्दल मात्र कोणी बोलताना दिसत नाही.
यामुळे आता पाणीटंचाईचे सर्व जबाबदारी जलजीवन योजनेवर टाकून अधिकारी मोकळे होतीलही मात्र धामणशेत ग्रामपंचायती मधील दोन वर्षांपूर्वी एक पाणीपुरवठा योजना झाली मात्र तिचे पाणी मिळालेच नाही त्याअगोदर याच गावात एक मोठी जमिनीला लागून पाण्याची टाकी बांधलेली दिसते हिचाही उपयोग होत नाही.
यामुळे अगदी 30 घरांचा हा पाडा असताना गेल्या नंतर अगदी तीन पाण्याच्या टाक्या दिसता आणि दुसरीकडे याच गावातील विहीरीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो आहे.असे असताना येथील लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाहीत.त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः चुराडा या भागात पहावयास मिळत आहे. मोखाडा जि. प पाणी पुरवठा विभाग उपअभियंता ललित बोरदे यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.
जलजीवन मिशन योजनेतून पाणीपुरवठा होत असलेली पाईप लाईन नादुरुस्त झालेली होती ती दुरुस्ती करुन पाणीपुरवठा चालू होईल.- ललित बोरदे उप अभियंता, पाणी पुरवठा उपविभाग मोखाडा.