विरार : राज्य सरकारने गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख पर्यंत वाढवल्यामुळे रुग्ण आणि रुग्णालयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी रुग्ण मित्रांनी सातत्याने मागणी केली होती.
या योजने अंतर्गत होणाऱ्या उपचारांचे दर पत्रक जैसे थे असल्याने योजना अंगीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णांवर मोफत उपचार करताना वाढत्या महागाईचा सामना होता. त्यामुळे उपचारांच्या दर पत्रकांविषयी फेरविचार व्हावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
रुग्ण आणि रुग्णालयांमध्ये समन्वय साधण्यासाठी या योजनेतून दोहोंना लाभ मिळण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. तरीही अंगीकृत रुग्णालय रुग्णांकडून अतिरेक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या, या समस्या करावा लागत लक्षात घेत रुग्ण मित्र राजेंद्र ढगे यांनी दरपत्रकांवर सखोल अभ्यास करून तत्कालीन जीवनदायी योजनेचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांना योजनेत होणाऱ्या उपचारांची दर वाढवावे अशी मागणी केली होती. जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन पेक्षाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या उपचारांचे दर कमी असल्याने इतरांची तफावत दर करणे आवश्यक असल्याचेही डगे यांनी स्पष्ट करीत ही मागणी लावून धरली होती.
नवीन सुधारित योजनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचाही समावेश करण्यात आला असून त्याद्वारे १६५३ उपचार पद्धती मिळणार आहेत. या योजनेचे विस्तारीकरण करताना यात नवीं रुग्णांच्या देखील समावेश करण्यात येणार आहे. मात्र महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रियांचे दर अत्यल्प असल्याने रुग्णालयांना वाढत्या महागाईचा फटका बसत होता. डगे यांच्या पाठपुराव्यानंतर शस्त्रक्रियांचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण, रुग्णालयांना दिलासा मिळेल.
• बायपास शस्त्रक्रिया जुने दर एक लाख रुपये, नवीन दर १ लाख २५ हजार
हृदयाचा झडपा बदलणे - जुने दर १ लाख २० हजार रुपये, नवीन दर १ लाख ४५ हजार रुपये
• किडनी स्टोन जुने दर ३० हजार रुपये, नवीन दर ४० हजार रुपये