पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरे pudhari photo
पालघर

Palghar Durga Devi temples : पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरे

डहाणूची महालक्ष्मी,विरारची जीवदानी महिला भाविकांचे आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे ः शारदीय नवरात्रोत्सवातला सुरूवात झाली असून पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर सर्व मंदिरांमध्ये चोख व्यवस्था करण्यात आली असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले आहे. दरम्यान उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची पाऊले जिल्ह्यातील देवीमंदिरांकडे वळू लागले आहेत.

दरम्यान नवरात्रीत भगिनीही एका दिवसाच्या प्रावासात देवींच्या दर्शन यात्रेचे आयोजन करतात. विरारच्या जीवधन गडावरील आई जीवदानी मंदिर, जुचंद्र येथे असलेले चंडीका माता मंदिर ,वज्रेश्वरी मंदिर , हेदवडे महालक्ष्मी मंदिर, डहाणूतील महालक्ष्मी मंदिर ,आशागड येथील संतोषी माता मंदिर, केळवे येथील शीतला माता मंदिर ,एडवणची समुद्री कातळातील आशापुरा मंदिर यासह वाघोली गावातील वाघेश्वरी मंदिर, व सफाळे गावात असलेले कुर्लाई देवी या मंदिरांविषयी थोडक्यात माहिती .

श्री चंडिका माता

जूचंद्र : वसई तालुक्यातीलनायगाव या पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या जूचंद्र गावातील समुद्र सपाटीपासून 400 फुटांवर पर्वतावर विराजमान झालेली आई श्री चंडिका माता .शिलाखंडाच्या गुहेत असलेल्या या पुरातन मंदिरात श्री चंडीका ,श्री कालिका , श्री महिषासुर मर्दिनी व श्री गणेश यांच्या पाषाणी पूर्वाभिमुख मूर्ती आहेत.

महालक्ष्मी

खानिवडे: अहमदाबाद महामार्गावरील खानिवडेतील हेदवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आद्यपुजेसह साजरा होणार्‍या नवरात्रोत्सवात नऊ दिवस हजारो भाविक सामील होत असतात . विरार रेल्वे स्थानकापासून 15 किमी व मुंबई अहमदाबाद महामार्गापासून सुमारे दोन किमी अंतरावर दूर असलेले हे मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान आहे .

संतोषी माता मंदिर

आशागड: डहाणू रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला आशागड नावाच्या पर्वतावर संतोषी मातेचे मंदिर हे महाराष्ट्र व गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान आहे . येथे जाण्यासाठी डहाणू रेल्वे स्थानक हे जवळचे रेल्वे स्टेशन असून येथून बस ,रिक्षा व डम डम ने जाण्याची सोय असून महामार्गावरील चारोटी नाक्यावरून बसेस व रिक्षाची सोय आहे .

जीवदानी : विरार पूर्व

जीवधन गड : जीवदानी गडावर साजर्‍या होणार्‍या नवरात्र उत्स्ववा साठी जाणार्‍या भाविकाना जाण्यासाठी विरार पूर्वेला रेल्वे स्थानका पासून अवघ्या 3 कि मी अंतरावर जीवधन गडाचा पायथा आहे . येथून जीवदानी मंदिरात जाण्यासाठी पायर्‍यांचा रस्ता असून रोप वेने मंदिरात जाता येते .नवरात्रीत वसई तालुक्यासह ठाणे,पालघर,मुंबई ,रायगड यासह अनेक ठिकणाहन भाविक येतात .

महालक्ष्मी डहाणू :

विव्हळवेढ ः मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विव्हळवेढे येथे असलेली आदिवासींची आदिमाता डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. येथील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बर्‍याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे.बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे.देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर महामार्गावरील वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिरपायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायर्‍या आहेत.मात्र अवघड डोंगर न चढता सर्वाना देवी महालक्ष्मी दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून महामार्गाच्या अगदी कडेला गडाच्या खाली अत्यंत सुबक मंदिर बांधलेले आहे .

वज्रेश्वरी देवीचे

वज्रेश्वरी : मंदिर हे ऐतिहासिक महत्वाचे स्थान असून मंदाग्नी पर्वताच्या दक्षिणेस आहे. प्रसिद्ध वसई मोहीम जेव्हा चिमाजी अप्पांनी हाती घेतली तेव्हा मोहीम फत्ते होण्यासाठी चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवीला कौल लावला होता . वसई किल्ला जिंकून अप्पांनी हि मोहीम यशस्वी केली येथील मंदिरात वज्रेश्वरी, रेणुका व कालिका यांच्या मुर्त्या आहेत . येथे पोहोचण्यासाठी मुंबईहून वसई व विरार मार्गे पोहोचता येते

शीतला माता मंदिर

केळवे ः केळवे माहीम या गावच्या किनारपट्टीवर असलेल्या केळवे बीचवर शीतला मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे . .इथे जाण्यासाठी पालघर आणि सफाळे हे जवळचं रेल्वेस्थानक आहे. पालघर तालुक्यात असलेल्या केळवा बीच येथे मुंबई, ठाणे,तसेच राज्याच्या काना कोप-यातुन पर्यटक हजेरी लावत असतात. पश्चिम रेल्वेच्या केळवे स्टेशन पासून 9 कि. मि. पालघर स्टेशन पासून 17 कि.मी.अंतरावर हे मंदिर आहे

वाघोली गावाची ग्रामदेवता

वाघेश्वरी: नालासोपारा पश्चिम: म्हणजे वाघेश्वरी देवीमाता . नालासोपारा-निर्मळ मार्गावरील वाघोली या छोटयाशा निसर्गरम्य गावात सुंदरशा तलावाकाठी श्रीवाघेश्वरी मातेचे मंदिर आहे.नवरात्रोत्सवात भजन, कीर्तन, नामसंकीर्तन व हवन केले जाते. वाघेश्वरी ही येथील ग्रामदेवता आहे. देवीच्या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरणही करण्यात आलेले आहे. 12 डिसेंबर 1990 रोजी हे मंदिर बांधण्यात आले.

kulaidevi temple

कुर्लाई देवी मंदिर

सफाळे ः पश्चिम रेल्वे वरील सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या सफाळे या गावात हे मंदिर आहे .कुर्लाई हे सफाळ्याचे ग्रामदैवत असून पालघर व वसई तालुक्यातील अनेकांचे कुलदैवत आहे . स्टेशनला अगदी जवळ असल्याने पायीही येथे जाता येते ..या मंदिरापुढे म्हणजेच सफाळे पश्चिमेला एडवनच्या समुद्रकिनारी आशापुरा मंदिराला महिला भक्त नक्की भेट देतात .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT